Crime News esakal
पुणे

Pune Crime : तरूण विवाहितेच्या खूनाचा उलगडा; नवर्‍याच्या प्रेयसीने गळा घोटल्याचे निष्पन्न

येथील वाडा रस्त्यावरील गृहप्रकल्पात राहणाऱ्या तरूण विवाहितेचा, नवर्‍याच्या प्रेयसीनेच गळा घोटल्याचे निष्पन्न झाले

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : येथील वाडा रस्त्यावरील गृहप्रकल्पात राहणाऱ्या तरूण विवाहितेचा, नवर्‍याच्या प्रेयसीनेच गळा घोटल्याचे निष्पन्न झाले असून खेड पोलिसांनी संशयित आरोपी महिलेस अटक केली आहे.

कोमल गणेश केदारी ( वय २८ वर्षे, रा. शिवसाम्राज्य सोसायटी, वाडा रोड, राजगुरूनगर ता. खेड. ) या विवाहितेचा संशयित रितीने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. तिचा पती गणेश भिकाजी केदारी हा कंपनीत कामावर गेल्यानंतर, दुपारी एकटी घरात झोपली असताना तिचा कोणीतरी गळा आवळून खून केला होता.

खेड पोलिस ठाण्यात दुसऱ्या दिवशी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेड पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीगारांमार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावला. प्रियकराच्या प्रेयसीनेच कोमलचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT