pune crime update attacking each other with koyta Incidents in Pandavanagar Sakal
पुणे

Pune News : एकमेकांवर कोयत्याने हल्ला, भररस्त्यात दोघे रक्तबंबाळ; पांडवनगरमधील घटना

पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणातून झालेल्या वादात दोघांनी एकमेकावर कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघेही रक्तबंबाळ झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Pune News: पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या कारणातून झालेल्या वादात दोघांनी एकमेकावर कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघेही रक्तबंबाळ झाले आहेत. शुक्रवारी (ता.२९) दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास पांडवनगरमधील गोलंदाज चौकाजवळ ही घटना घडली.

सद्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वार करणारे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या प्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किशोर गोविंद धोत्रे (वय ३६, रा.वैदुवाडी पोलिस चौकीसमोर, शंकरमठ हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शंकर मिरेकर (वय ४५, रा.वडारवाडी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरेकर हा त्यांच्या पत्नीशी फोनवर बोलतो, असा संशय फिर्यादी यांना होता. त्याबाबत चर्चा करण्यासाठी फिर्यादी पांडवनगर येथे आले होते. त्यावेळी दोघांत वाद झाला झाला.

मिरेकर याने फिर्यादीला शिवीगाळ करून जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर मिरेकर याचा मुलगा आणि मुलाचा मित्र तेथे आले. त्यांनी फिर्यादींवर कोयत्याने वार करून लाकडी बॅटने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

शंकर बादशहा मिरेकर (वय ४२, रा. जुनी वडारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चतुःश्रृंगी पोलिसांनी किशोर धोत्रे याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरेकर यांना धोत्रे याने चहा पिण्यासाठी बोलावून घेतले होते.

त्यावेळी धोत्रे याने पूर्वीचा वाद मनात धरून लोखंडी वस्तू मिरेकर याच्या पायावर आणि मानेवर खुपसली. या हल्ल्यात मिरेकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी धोत्रेवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

भरदिवसा झालेल्या या मारहाणीचा थरार रस्त्यावर सुरू होता. दोघे एकमेकांनी केलेल्या मारहाणीत रक्तबंबाळ झाले होते. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. त्यांचा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी, गुन्हे निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT