pune crime sakal
पुणे

Pune Crime : पाटस-दरोडयाच्या तयारीतील रेकाॅर्ड वरील टोळी जेरबंद

पाटस (ता.दौंड) येथे दरोडयाच्या तयारीत असणाऱ्या रेकाॅर्ड वरील टोळीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले.

अमर परदेशी

पाटस : पाटस (ता.दौंड) येथे दरोडयाच्या तयारीत असणाऱ्या रेकाॅर्ड वरील टोळीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले. संबधीत आरोपींकडुन गावठी पिस्टल, काडतुस, कोयता, कटावणी, चार चाकी वाहन असा एकुण ४ लाख ४९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

दत्ता अशोक शिंदे रा.राहू ता.दौंड जि.पुणे,सचिन लक्ष्मण भोसले रा. आष्टी जि.बीड,सचिन बेलदार रा.येवला जि.नाशिक,मल्हार अडागळे रा.रवळगाव ता.कर्जत,जि.नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मामा उर्फे रिकेबी रा.कुर्डुवाडी ता.माढा जि.सोलापुर असे फरार आरोपीचे नाव आहे.

याबाबत यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी माहीती दिली.पाटस येथील कारखाना चौकातील गाव तलावाच्या लगत रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्ती अनुचित प्रकाराच्या तयारीत असल्याची पोलिसांना माहीती मिळाली.त्या अनुषंगाने यवत पोलिस व पाटस पोलिस पथकाने त्याठिकाणी धाव घेतली.पोलिसांनी आरोपींना काही समजण्या अगोदर अंधारात मोठया शिताफिने पडकले. मात्र,एकजण पळुन जाण्यास यशस्वी झाला.

पोलिसांनी सबंधीत व्यक्तींची तपासणी केली असता.त्यांच्याकडे एक पिस्टल, काडतुस, कटावणी, कोयता,चारचाकी वाहन आदी मिळुन आले. प्राथमिक चौकशीत संबधीत आरोपी हे दरोडयाच्या तयारीत असल्याचे समजले.आधिक चौकशीत हे पोलिस रेकाॅर्ड वरील गुन्हेगार असल्याचेही समोर आहे.

त्यांनी यवत,शिरुर,मिरजगाव आदी पोलिस ठाण्याच्या हद्दी त विजेचे रोहीत्र चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.आरोपींकडे सखोल तपासात अजुन गुन्हे केल्याचे उघडकीस येणार आहे.अशी माहीती पोलिस निरिक्षक शेडगे यांनी दिली.

सदरची कामगीरी यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत शेडगे,पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे,पोलिस उपनिरीक्षक मिरा मटाले,पोलिस हवालदार संजय देवकाते,निलेश कदम,गुरुनाथ गायकवाड,अक्षय यादव,रामदास जगताप,प्रमोद गायकवाड,महेंद्र चांदणे,समीर भालेकराव,राजीव शिंदे,मारुती बाराते आदी पोलिस पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT