पुणे

दहीहंडीतील लावणीचा ठसका धनकवडीत आयोजकांना महाग

CD

पुणे, ता. ९ ः दहीहंडी उत्सवात विनापरवाना लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी धनकवडी परिसरातील दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह लावणी नृत्यांगना आणि सहकलाकारांवर सहकारनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. नृत्यांगना राधा पाटील यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

धनकवडीतील तीन हत्ती चौकात अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी (ता. ५) दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नृत्यांगना निशा मुंबईकर यांच्या लावणी नृत्याचे आयोजन केले होते. दहीहंडी उत्सवातील कार्यक्रमांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे तसेच कलाकारांनी मुंबईतील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आयोजकांकडून या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला नव्हता. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष पवन सूर्यकांत डोंगरे, सागर सोनवणे, नृत्यांगना निशा मुंबईकर आणि त्यांच्या सहकलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक राहुल राठोड यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक मिठारे तपास करीत आहेत.

दरम्यान, धनकवडीतील रिस्की बॉइज ग्रुप (शिवराज मित्रमंडळ) यांच्याविरुद्धही विनापरवाना लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष बंडू मडीवाल, उपाध्यक्ष मयूर भावेकर, नृत्यांगना शुभांजली ऊर्फ शुभांगी थोरात यांच्यासह चार नृत्यांगनांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सोपान पाटोळे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT