पुणे

डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज

CD

पुणे, ता. २४ : शहरात डेंगीचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येवरून महापालिकेच्या आरोग्य विभागावर टीका होत असतानाच, आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी नायडू रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपचार, औषधसाठा आणि खाटांच्या उपलब्धतेची पाहणी करून त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. नागरिकांनी घाबरून न जाता महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
शहरात मागील तीन महिन्यांत २ हजार २९९ डेंगीचे रुग्ण आढळले असून, नुकताच एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची ओरड होत होती. या पार्श्वभूमीवर, आयुक्त राम यांनी बाणेर येथील महापालिकेच्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयास भेट दिली.
आयुक्त राम म्हणाले, ‘‘महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा आणि औषधांचा साठा उपलब्ध आहे. डेंगीची लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयांत उपचार घ्यावेत. डेंगीच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नये.’’

सर्व विभागांना एकत्रित प्रयत्नांचे आदेश
डेंगी रोखण्यासाठी केवळ आरोग्य विभागच नव्हे, तर बांधकाम, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागांनीही समन्वयाने काम करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी साचलेले पाणी, कचरा प्रकल्प आणि अतिक्रमणाच्या जागांवर होणारी डासोत्पत्ती रोखण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. सर्व विभागांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नायडू रुग्णालयात मोफत उपचार
डॉ. नायडू रुग्णालयात डेंगीच्या रुग्णांसाठी ५० स्वतंत्र खाटांची व्यवस्था असून, सध्या दररोज १० ते १५ खाटांचा वापर होत आहे. गंभीर रुग्णांवर नायडू आणि कमला नेहरू रुग्णालयात उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांत मोफत निदान चाचण्यांची सुविधाही उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT