Pune Dhamani Ambegaon Jay Hind Library 
पुणे

Pune : धामणीत जयहिंद वाचनालयाकडून वाचकांना ७० प्रकारच्या दिवाळी अंकाची मेजवानी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले

सुदाम बिडकर

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील जयहिंद वाचनालयात खास वाचकांसाठी आज सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात सुमारे ७० प्रकारचे दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले होते.

ग्रामीण भागातील वाचकांना शहरी भागातील वाचकांप्रमाणे विशेष करून महिला वाचकांना सर्व प्रकारचे दिवाळी अंक वाचायला मिळावे यासाठी जयहिंद वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिवाळीला वेगवेगळे दिवाळी अंक उपलब्ध करून दिले जातात. वाचकांना या दिवाळी अंकाची माहिती मिळावी म्हणून या दिवाळी अंकाचे प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

यावर्षी सर्व वृत्तपत्रांचे दिवाळी अंक, आवाज,जत्रा, शतायुषी, आक्रोश,गृहशोभिका, ज्योतिष तंत्र मंत्र,हास्य धमाल, पोलीस शोधकथांवरील पोलीस टाईमस् व लहान मुलांसाठी चंपक,रानवारा, हस्ती दुनिया, किशोर,

आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दिवाळी अंक, ज्योतिष, आरोग्य शेती, विनोदी, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, चित्रपट, साहित्य,पाककला, या विषयातील असे एकूण ७० दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती ग्रंथपाल दिलीप आळेकर यांनी दिली.

या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच सागर जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी जयहिंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद देखणे, माजी सरपंच अंकुश भूमकर, चिंतामणी जाधव, अक्षय विधाटे,रेश्मा बोऱ्हाडे, सुनीता बोऱ्हाडे, राजाराम विधाटे, वंदना दहिवळ, निर्मला कासार, मच्छिंद्र अमाप, पांडुरंग बोऱ्हाडे, तानाजी रोडे, किसन विधाटे, ग्रंथपाल दिलीप आळेकर, संदीप आळेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT