Diveghat sakal
पुणे

दिवेघाट बनतोय मृत्यूचा सापळा

दिवेघाटातील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा घाट सध्या मृत्यूच्या सापळ्याचे स्वरूप धारण करू लागला आहे.

कृष्णकांत कोबल

हडपसर : फुरसुंगी रेल्वे उड्डाणपूल ते दिवेघाट या पालखी मार्गाचे रूंदीकरण गेली अनेक वर्षांपासून रखडले आहेच. मात्र, त्याचवेळी या मार्गाच्या डागडुजीकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवेघाटातील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा घाट सध्या मृत्यूच्या सापळ्याचे स्वरूप धारण करू लागला आहे.

दिवेघाटाच्या सुमारे साडेतीन किलोमीटरच्या परिसरात खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी दोनदोन फुटावर खोल खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकवताना दररोज एखाद्यातरी वाहनाला अपघात होत आहे. तसेच वारंवार अपघातसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. याशिवाय वाहनांच्या वेगावर परिणाम होत असल्याने वाहतूक कोंडीही होत असते. येथून प्रवास करणारे कामगार, नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी, व्यवसायीक, पर्यटक आदींना हे खड्डे चुकविण्यासाठी जीव मुठीत घेऊन मोठी कसरत करावी लागत आहे. मालवाहू वाहनांना होणारे अपघात, ही जणू नित्याचीच बास झाली आहे.

फुरसुंगी रेल्वे उड्डाणपूलापासून सुरू झालेली ही खड्ड्यांची मालिका दिवे घाटाच्या टोकापर्यंत पसरलेली दिसते. "पालखीमार्ग म्हणून विकसीत होत असलेल्या या मार्गावर सध्या रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा संभ्रम होत आहे, इतकी गंभीर परिस्थिती येथे आहे. दिवे घाट आगोदरच धोकादायक आहे. त्यात पुन्हा घाटातील खड्ड्यांची साखळी जीवघेणी ठरत आहे. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होताना दिसत आहेत.

सेल्फी वुईथ खड्डा असा उपक्रम राबविणाऱ्या लोकप्रतिनिधींसह प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. संबधीत प्रशासनाने घाटातील खड्ड्यांची डागडुजी करून वाहतुकीचा धोका कमी करावा अन्यथा, आंदोलन करावे लागेल.'

- राहुल शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी

"हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला असला तरी सध्या देखभालीसाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर लगेचच देखभाल दुरुस्तीचे काम मार्गी लागेल'

- अनिल गोराड, तांत्रिक उपव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT