पुणे

तीन कोटींच्या अमली पदार्थांसह महिला अटकेत

CD

पुणे, ता. २७ : दिल्लीहून पुण्यात आलेल्या मिझोराममधील महिलेकडून तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून (डीआरआय) ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस येण्याची शक्यता ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
लालरे मलियानी (वय ३२, रा. ऐझॉल, मिझोराम) असे या महिलेचे नाव असून, तिला अटक करण्यात आली आहे. ‘डीआरआय’ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकातून निघालेल्या स्वर्णजयंती एक्स्प्रेसमधून मलियानी प्रवास करत होती. तिच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (ता. २५) पहाटे पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन परिसरात सापळा लावण्यात आला. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मलियानी हिच्याकडील पिशवी, तसेच साहित्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्याकडील पिशवीत दोन हजार ५३२ ग्रॅम स्फटिकासारख्या दिसणाऱ्या गोळ्या सापडल्या, तसेच विविध रंगांच्या गोळ्या सापडल्या. अमली पदार्थ तपासणी उपकरणाद्वारे (नार्कोटिक्स डिटेक्शन किट) तपासणी करण्यात आली. तपासणीत मलियानीने अमली पदार्थ बाळगल्याचे उघडकीस आले. तिच्याकडून ॲम्फेटामाइन, क्रिस्टल मेथ, एमडीएमए अशा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत तीन कोटी ४१ लाख रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आफ्रिकन व्यक्तीकडून अमली पदार्थांचा पुरवठा
अशिमा नावाच्या एका आफ्रिकन व्यक्तीने हे अमली पदार्थ दिले होते. रेल्वे तिकिटाची व्यवस्था त्याने केली होती. म्हैसूरला पोहोचल्यानंतर अमली पदार्थांची पिशवी एका व्यक्तीला देण्याची सूचना अशिमाने महिलेला दिली होती, असे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. आरोपी महिलेला विशेष न्यायालयाने ‘डीआरआय’च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री शहरातील मोकळ्या जागा, क्रीडांगणे आणि मनोरंजनासाठीची मैदाने आमदारांना आणि बिल्डर मित्रांच्या हवाली करत आहेत - आदित्य ठाकरे

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

Mumbai News: सी लिंकला 'तारीख पे तारीख'! 'वांद्रे-वर्सोवा'साठी चार टप्प्यांत १,४२१ दिवसांची मुदतवाढ

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

SCROLL FOR NEXT