वाडा केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद
चास : वाडा (ता. खेड) येथे पदवीधर गटात ८१.६३ टक्के, तर शिक्षक गटात ९३.३३ टक्के मतदानाची नोंद झाली. दोन्ही गटांतील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने मतदान केंद्रावर निवडणुकीची चुरस पाहायला मिळाली. वाडा मतदान केंद्रांतर्गत एकूण ४७ गावांचा समावेश होता. या केंद्रावर पदवीधर गटातील ९८ मतदारांपैकी ८० मतदारांनी, तर शिक्षक गटातील १५ मतदारांपैकी १४ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. पदवीधरांच्या तुलनेत शिक्षक मतदारांचा मतदानातील सहभाग अधिक राहिला.
तळेगाव केंद्रावर चोख बंदोबस्त
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पुणे विभाग शिक्षक मतदार संघात एकूण ९७ टक्के; तर पदवीधर मतदार संघात एकूण ७८ टक्के मतदान झाले आहे. शिक्षक मतदारसंघात ९४ पैकी ९१ इतके मतदान झाले असून, यामध्ये ५० महिला व ४१ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदार संघात ५४५ पैकी ४२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. येथील केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी आपापल्या सोयीनुसार मतदानाचा हक्क बजावला. पोलिस व निवडणूक प्रशासन यांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.
टाकळी हाजीत शांततेत प्रक्रिया
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या मतदानात पदवीधर मतदारसंघात ५२४ पैकी ३५८ मतदारांनी, तर शिक्षक मतदारसंघात ४६ पैकी ४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पदवीधर मतदारसंघात ६८.३२ टक्के, तर शिक्षक मतदारसंघात ९७.८३ टक्के मतदान झाले.
राहू केंद्रावर मतदारांमध्ये उत्साह
राहू : राहू (ता. दौंड) येथील मतदान केंद्रावर पुणे शिक्षक विभाग आणि पुणे पदवीधर विभागासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लावल्या होत्या. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मतदान केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद व मतदारांचा ओघ सुरु होता. मतदारांमध्ये मतदानाबाबत मोठी जागरूकता दिसून येत होती. मतदानाचा वाढता उत्साह होता. मतदान केंद्रावर यवतचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस हवालदार गणेश कुतवळ, ज्ञानेश्वर कोरे, पोलीस पाटील सुरेश सोनवणे, यांच्यासह पोलीस पथक तैनात करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.