पौड, ता.१९ : विधान परिषदेच्या पुणे विभागाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुळशी तालुक्यात मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवारी (ता. २३) तालुक्यात पदवीधरसाठी पाच तर शिक्षकसाठी दोन केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार विजयकुमार चोबे, निवासी नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी यांनी दिली.
मुळशी तालुक्यात २१७३ पदवीधर मतदार असून ३८७ शिक्षक मतदार आहेत. पदवीधरसाठी पिरंगुटला एक मतदान केंद्र असून त्यात ६०७ मतदार आहेत. तर हिंजवडीला चार केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यापैकी एका केंद्रात ३९३ तर उर्वरित तीन केंद्रांत प्रत्येकी ३९१ मतदार आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी पिरंगुटला एक केंद्र असून त्यात ३३ मतदार आहेत. तर हिंजवडीला दुसरे केंद्र असून त्यात ३५४ मतदार आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, शिपाई आणि पोलिस कर्मचारी असे सहा अधिकारी कार्यरत असणार आहेत. त्यासाठी झोनल अधिकारीही नियुक्त केले आहेत. निवडणुकीचे साहित्य पौडमधून घेतले जाणार असून मतदान झाल्यानंतर ते बालेवाडी येथे मतमोजणीसाठी जमा केले जाणार आहे. तथापि ही मतदान प्रक्रिया यंत्राऐवजी बॅलेट पेपरवर होणार असून मतदारांना पसंतीक्रम नोंदवून उमेदवारांना मत द्यायचे आहे.
उमेदवारांच्या रेकॉर्ड कॉलचा धुमाकूळ
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनी शिक्षक आणि पदवीधरांच्या गाठभेटी घेतल्या असून तालुक्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मतदारांशी संवाद साधत आहेत. उमेदवारांच्या रेकॉर्ड कॉलनेही सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.