pune festival sakal
पुणे

Pune Festival 2023 : रसिकांनी अनुभवली सुरांची जादू

मैफलीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती होती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘मेरे हाथ में, तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो’, ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’, ‘अभि मुझमें कही’ अशी एकसे एक बहारदार गाणी अफाट ऊर्जेने सादर करणारे सोनू निगम आणि त्यांच्या प्रत्येक गाण्याला टाळ्या-शिट्ट्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद देणारे रसिक, असे चित्र रविवारी (ता. २४) पाहायला मिळाले. रसिकांनी सोनू निगम यांच्या सुरेल आवाजाची जादू अनुभवली.

निमित्त होते, ३५ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित ‘म्युझिकल नाईट’ या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात सोनू निगम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना ऐकण्यासाठी गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या सभागृहात रसिकांनी ‘हाऊसफुल्ल’ गर्दी केली होती. सोनू निगम यांनीही अनेक जुनी व नवीन हिंदी गाण्यांची मेजवानी पेश केली. रसिकांनी मराठी गाण्यांची फर्माईश केल्यानंतर त्यांनी ‘हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने’ हे गीत सादर केले.

या मैफलीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासह पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कलमाडी, त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी, फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, कोहिनूर ग्रुपचे राजेश गोयल आदी उपस्थित होते. सुरेश कलमाडी यांनी सोनू निगम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मीरा कलमाडी यांच्या हस्ते सर्व वादक आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला. दुरिया शिपचांडलर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT