pune festival sakal
पुणे

Pune Festival 2023 : मुशायरामध्ये शेरो-शायरीची मेजवानी

पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित कार्यक्रमास रसिकांची दाद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सामाजिक एकता व समतेचा संदेश, प्रेमाची कबुली अशा विविध विषयांवरील शायरींना रसिकांची मनमोकळी दाद मिळत होती. ‘क्या बात है’ असे म्हणत ‘वन्स मोअर’ची दिलेली दाद आणि टाळ्या व शिट्ट्यांच्या वर्षावाने सभागृह दुमदुमले होते. निमित्त होते, पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित ‘ऑल इंडिया मुशायरा’चे.

या मुशायरात उर्दू आणि हिंदी शेरोशायरीची मेजवानी रसिकांना मिळाली. डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी आणि डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे आयोजित हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. मुशायरात डॉ. मंजर भोपाली, डॉ. लता हया, अंजुम बाराबंकवी, अबरार काशिफ, सरदार सलीम, सागर त्रिपाठी, डॉ. कासीम इमाम, फरहान दिल, अब्दुल हमीद हुनर, शाहनवाज काजी सईल, अब्दुल हमीद इनामदार, तन्वीर सोलापुरी हे सहभागी झाले होते. डॉ. कासीम इमाम यांनी मुशायराचे सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इक्बाल अन्सारी यांनी केले.

पुणे फेस्टिव्हलमध्ये १९९२ पासून हा मुशायरा आयोजित केला जातो. याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे मुख्य समन्वयक ॲड. अभय छाजेड, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आबेदा इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या शंभर वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT