arrest sakal
पुणे

वनविभागाची जमीन बळकावणारा सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

शहराच्या वेगवेगळ्या भागात जमीन बळकाविण्याचा प्रकार, औरंगाबाद येथील कारागृहात रवानगी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातीत वनविभागाच्या जमीनींवर बेकायदा ताबा मारणाऱ्या तसेच विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश दिले असून संबंधित गुन्हेगाराची रवानगी औरंगाबाद कारागृहात करण्यात आली आहे.

राज गुलाब शेख (वय 29, रा. इंदिरानगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याच्याविरुद्ध सरकारी जमिनींची बेकायदा विक्री, खंडणी, मारहाण, शस्त्र बाळगणे असे विविध प्रकारचे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध "एमपीडीए'अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड, गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता.

या प्रस्तावास पोलिस आयुक्त गुप्ता यांनी नुकतीच मंजुरी दिली. त्यानुसार शेख यास एक वर्षासाठी औरंगाबाद येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. मागील वर्षभरात शहरातील 58 सराईत गुन्हेगारांवर "एमपीडीए' अंतर्गत कारवाई करुन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT