पुणे

गणेशोत्सवासाठी नियोजनावर भर द्या

CD

पुणे, ता. २९ : यंदाचा गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडावी, गर्दीचे नियोजन, वाहतूक व पार्किंग व्यवस्था सक्षम करावी, अडथळे दूर करून उत्सव अधिकाधिक चांगला होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी पुणे पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत केली.
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी फरासखाना पोलिस ठाण्याच्या परिसरात गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. या वेळी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये, तांबडी जोगेश्‍वरीचे प्रशांत टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे सूरज रेणुसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, जिलब्या मारुती मंडळाचे भूषण पंड्या आदी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणुकीत किती पथके असावीत, मंडळांमधील अंतर कमी करावे, असे मुद्दे पोलिसांकडून मांडण्यात आले. त्यावर प्रत्येक वर्षी संबंधित विषयावर चर्चा होऊन मार्ग काढला जातो. त्यामुळे त्याच विषयांवर पुन्हा चर्चा नको. यापेक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, हे सुचवावे. तसेच गणेशोत्सव व मिरवणूक कालावधीत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचे नियोजन होणे गरजेचे असून त्यावर पोलिसांनी भर द्यावा, अशी मागणी मंडळांनी केली.
शेट्ये म्हणाले, ‘‘गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक अधिक चांगल्या पद्धतीने कशी साजरी होईल, त्यासाठीची व्यवस्था काय असणार यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. वेगवेगळ्या पर्यायांवर मंडळांनी आपली मते मांडली आहेत. उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडावा, यासाठी गणेशोत्सव मंडळे प्रयत्नशील आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT