Pune Traffic Sakal
पुणे

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी; एकेरी वाहतूक करण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष...

परिणामी कालव्याला लागून असलेले सर्वच रस्त्याला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जागृती कुलकर्णी

Pune Traffic, सिंहगड रस्ता - सिंहगड रस्त्याचा आजचा दिवस देखील प्रचंड वाहतूक कोंडीचा निघाला. सकाळी साडेआठ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. मुख्य सिंहगड रस्त्यासह अंतर्गत रस्त्याला देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मुख्य सिंहगड रस्त्याला उड्डाणपूलाचे सुरू असलेले काम, खड्डे, पाऊस, तसेच महामार्गाला वारजे भागात आणि पुलावर झालेल्या गैरसोयीमुळे स्वामीनारायण मंदिर नऱ्हे, यासह विविध भागातील संपूर्ण वाहतूक सिंहगड रस्त्याला वळवण्यात आली होती.

परिणामी कालव्याला लागून असलेले सर्वच रस्त्याला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कॅलिंक परिसर तसेच विश्रांती नगर आणि जनता वसाहत कडे जाणाऱ्या रस्त्याला वाहने अडकली होती. माणिक बाग ते हिंगणे अवघे एक ते दीड किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सुमारे एक तास लागत होता.

महामार्गासह, नऱ्हे, धायरी, वडगाव, खडकवासला ते डोणजे जांभुळवाडी परिसर या भागातील संपूर्ण वाहतूक सिंहगड रस्त्यालाच वळविल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

दृष्टिक्षेपात

* उड्डाण पुलाच्या कामाने रस्त्यात अडथळा.

* रस्त्यात पडलेले खड्डे.

* महामार्गाला अडकलेली वाहतूक.

* वाहतूक पोलिसांची संख्या मर्यादित.

* वॉर्डनच्या वतीने होत असलेल्या सहकार्यास नागरिकांच्या पाठिंबा नसणे.

* सर्वात महत्त्वाचे कॅलिंग ते विश्रांती नगर एकेरी वाहतूक करण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT