daru 
पुणे

पोलिस आले रे! दीप बंगला चौकात अलर्ट देत दारु विक्री

पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी तरुण तैनात

समाधान काटे

शिवाजीनगर(Pune): कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे दारुची दुकाने( Wine Shop) बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय जाहीर केले. दरम्यान पुण्यातील दीप बंगला चौकातील उप:काल सोसायटीच्या आतील बाजूने खुलेआम दारू (alcohol) विक्री होताना दिसत आहे. दारू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना(Customer) पार्सल देण्यासाठी रस्त्यावर दोन्ही बाजूला मुलं उभा केली आहेत. आलेल्या ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना दारू पुरवण्याचे काम बाहेर उभा केलेले तरुण करत आहेत.

''पोलिस आलेले कळावे यासाठी नजर ठेवण्यासाठी दोन तरुण तैनात केल्याचे दिसते. जादा दराने अनाधिकृत पणे दारू विक्री केली जात असताना अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिस प्रशासन काय करत आहे'' असा सवाल नागरिक करत आहेत.

रिक्षा, दुचाकी घेऊन ग्राहक दारू खरेदीसाठी येत आहेत. उप:काल सोसायटीच्या गेटसमोर कोरोना नियमांचे पालन न करता दारू खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. बुधवार (ता.५ मे) रोजी दिवसभर खुलेआम दारू विक्री केली जात होती. या ठिकाणी दारू मिळते हे कळताच अनेक नागरिक दारू खरेदीसाठी येत होते. दारू पुन्हा मिळेल की नाही म्हणून नागरिक दारूचे बॉक्स खरेदी करून घेऊन जात होते ‌

"संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे."

- राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी पोलिस स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohingya Boat Tragedy: समुद्रात आक्रोश! ५०० हून अधिक रोहिंग्याचा बुडून मृत्यू... मान्सूनच्या लाटांचा हाहाकार

FIFA World Cup फायनलपूर्वीच अर्जेंटिनावर होणार मोठी कारवाई? इंग्लंडवरील विजयानंतर 'ते' बॅनर झळकावणं पडणार महागात?

Latest Marathi News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला! आणखी एका वारकरी महिलेचा मृत्यू, आकडा पोहोचला 4 वर

का झाला उर्मिला आणि आदिनाथ कोठारेचा घटस्फोट? महेश कोठारेंच्या बुक लॉन्च कार्यक्रमात झालेल्या चर्चा, नेमकं काय बिनसलं?

Rahul Gandhi Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनापासून राहुल गांधी दूर का? काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT