Pune Accident Sakal
पुणे

Pune Accident : पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर 10 वाहनांचा भीषण अपघात; 1 मृत्यू, 5 गंभीर

या अपघातामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अशोक गव्हाणे

Pune Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर गुरुवारी (ता. १०) सकाळी नऊ पुन्हा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. काही शाळकरी मुलांना किरकोळ जखमा झाल्या. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कोंढवा स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. जखमींना भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघातामध्ये आठ ते दहा गाड्यांचे नुकसान झाले.

पावसाळी सिमेंट पाईप वाहतूक करणाऱ्या (एमएच १४ जेडी६९१९) गाडीचा ब्रेक फेल झाला. ती गाडी समोर असणाऱ्या टेम्पोला धडकली. टेम्पो कार आणि दोन दुचाकींना धडकल्यानंतर शाळेच्या गाडीला जाऊन धडकला. पुढे असणाऱ्या शाळेच्या बसची हायवा ट्रकला धडक बसल्याने विद्यार्थ्यांना दुखापत झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कृष्णा चौरे (वय ४३, रा. धनकवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातामुळे एका बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून त्या स्माशानभूमीपासून कात्रज चौकापर्यंत असल्याने पूर्णपणे वाहतूककोंडी झाली आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ३ महिन्यांच्या मुलीला गटारात फेकून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली आरोपी वडिलांना अटक

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT