पुणे

कात्रज चौकात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

CD

पुणे, ता. १७ : स्वारगेट ते कात्रजदरम्यान भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे कात्रज चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या परिसरात जड आणि अवजड वाहनांना (डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रेलर, कंटेनर) प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
पुणे-सातारा महामार्गावरून जुन्या कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी येथे प्रवेशबंदी असेल. सातारा रस्त्यावरून नवीन कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेशबंदी असणार आहे, तसेच मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरून वारजेमार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांनाही नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
सोलापूरकडून हडपसर, मंतरवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजकडे येणाऱ्या जड वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे प्रवेश मिळणार नाही. बोपदेव घाटमार्गे कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजकडे येणाऱ्या जड वाहनांनाही प्रवेशबंदी असेल. मार्केट यार्ड, गंगाधाम आणि बिबवेवाडीमार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना तसेच स्वारगेटकडून कात्रज चौकात जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी असेल.

पर्यायी मार्ग
अवजड वाहनांनी नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, सासवड, गराडे, चिंबळी, मंतरवाडी आणि वडकी या मार्गांचा वापर करावा. तसेच नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, गराडे, भिवरी, बोपदेव घाट, येवलेवाडी, पिसोळी आणि मंतरवाडी या मार्गांचाही पर्याय उपलब्ध आहे. साताऱ्याहून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बस आणि प्रवासी वाहनांनी नवले पूल परिसरातून उजवीकडे वळून कात्रजमार्गे स्वारगेटकडे जावे.

कात्रज परिसरातील रहिवाशांसाठी पर्यायी मार्ग
कात्रजकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कात्रज चौकातून जाण्याऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच वंडरसिटी सोसायटी ते कात्रज बायपास चौकात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कात्रज बायपास चौक ते मोरे बाग दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कात्रज बायपास चौक ते राजस सोसायटी, बायपास चौक ते कात्रज जुन्या बोगद्यापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

FDA Action : मुदतबाह्य, खराब अन्नपदार्थांच्या साठ्याची विल्हेवाट संशयास्पद; रिलायन्स रिटेल, ब्लिंकिटला ‘एफडीए’चा दणका

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, सव्वा नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT