gun firing sakal
पुणे

पुणे : मेट्रोशेडमधील 'त्या' गोळीबारामागे लष्कराचे युनिट नाही

संरक्षण विभागाच्या स्पष्टीकरणानंतर गोळीबाराचे गुढ झाले गडद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोथरुड (kothrud) येथील मेट्रोशेडच्या परिसरात संरक्षण विभागाचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण केंद्र किंवा युनिट नाही, त्यामुळे संबंधीत गोळीबार प्रकरणाशी संरक्षण विभागाचा संबंध नाही, असे संरक्षण विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता गोळीबाराच्या "त्या" घटनेबाबतचे गुढ वाढले आहे.

कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आहे. संबंधित ठिकाणी बुधवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तेव्हा त्यांना तेथे पिस्तुलातील दोन ते तीन रिकामी काडतुसे आढळून आली होती. दरम्यान, गुरूवारी दुपारी पुन्हा एकदा याच पद्धतीने आणखी काही रिकामी काडतुसे तेथे आढळून आली. तसेच मेट्रोच्या एका कर्मचाऱ्याच्या छातीला एक गोळी चाटुन गेल्याने तो जखमी झाल्याचे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले होते.

दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार करुन हा प्रकार त्यांच्याकडून झाला आहे का ? याविषयी विचारणा केली असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकऱ्यांनी स्पष्ट केले होते. याविषयी संरक्षण विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे अधिकृत प्रसिद्धि पत्रक जारी करण्यात आले. त्यामध्ये "कोथरूड येथील मेट्रो कार शेडच्या परिसरात कोणतेही संरक्षण विभागाचे कुठलेही युनिट किंवा फायरिंग रेंज नाही. त्यामुळे सैन्याच्या गोळीबारामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाही." अशी माहिती संरक्षण जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

संरक्षण विभागाच्या स्पष्टीकरणानंतर गोळीबाराचे गुढ झाले गडद

खुद्द संरक्षण विभागानेच पोलिसांची शक्यता खोडुन काढल्याने आता "तो" गोळीबार नेमका कोणी केला, याबाबतचे गुढ अधिकच वाढले आहे. विशेषत: तेथे सापडलेल्या गोळ्याच्या पुंगळ्या या "एके 47" या बंदुकीतील असल्याने त्याबाबची गंभीरता अधिकच गडद झाली आहे.

कोथरूड येथील मेट्रो कार शेडच्या परिसरात कोणतेही लष्करी युनिट किंवा फायरिंग रेंज नाही. त्यामुळे सैन्याच्या गोळीबारामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाही. अशी माहिती संरक्षण जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT