दुध sakal
पुणे

पुणे : दुधाला प्रतिलिटर १ रुपया बोनस

जिल्हा दूध संघाची घोषणा : अडीच कोटींचा निव्वळ नफा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १ रुपयाप्रमाणे बोनस (फरक) देण्याची घोषणा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाने (कात्रज डेअरी) गुरुवारी (ता.२३) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना यंदाच्या दिवाळीत ७ कोटी ९० लाख रुपयांचे बोनस वाटप केले जाणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळातही कात्रज डेअरीला २ कोटी ४९ लाख ४ हजार ३७५ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे या दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी यावेळी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा आॅनलाइन घेण्यात आली. या सभेला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. मार्च २०२१ अखेरपर्यंत संघाच्या ५८.३९ लाख रुपयांच्या ठेवी झाल्या असून या ठेवींमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १३ कोटी १९ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. शिवाय बॅंकेतील ठेवींवरील व्याजदर कमी होऊनही दूध संस्थांच्या त्यांच्या शेअर्सवर १५ टक्के लांभाश मिळणार आहे. यानुसार सर्व संस्थांना मिळून १ कोटी ४ लाख रुपयांचा लाभांश मिळणार असल्याचे हिंगे यांनी यावेळी स्पष्ट केले. या सभेला जिल्ह्यातील ६४४ दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी पुणे शहर व ग्रामीण भागात मिळून २५२ आधुनिक मिल्क पार्लर सुरू केली आहेत. तसेच मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, महाबळेश्‍वर आदी शहरासाठी नव्याने वितरण मार्ग सुरु केले आहेत.

गणेशोत्सवात २५ टन मोदकांची विक्री

कात्रज डेअरीने यंदाच्या गणेशोत्सवात मोदक आणि पेढ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तो करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवात फक्त कात्रज डेअरीचे २५ टन मोदक व पेढे विक्री झाले आहेत. या मोदकांच्या विक्रीतून संघाला एक कोटी रुपये मिळाले आहेत.

‘अक्रियाशील सभासदांना मतदानाचा अधिकार नको’

जिल्हा दूध संघाच्या अक्रियाशील सभासदांना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा अधिकार जेऊ नये. या सभासदांना मतदानाचा हक्क मिळू नये, यासाठी जिल्हा दूध संघाने न्यायालयात जावे, असा ठराव सर्व क्रियाशील दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT