Moka crime Sakal
पुणे

Pune Moka Crime : सराईत गुन्हेगार उमेश वाघमारेसह टोळीवर मोका

खडक परिसरात खंडणी आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार उमेश मुकेश वाघमारे आणि त्याच्या पाच साथीदारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

खडक परिसरात खंडणी आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार उमेश मुकेश वाघमारे आणि त्याच्या पाच साथीदारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

पुणे - खडक परिसरात खंडणी आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार उमेश मुकेश वाघमारे आणि त्याच्या पाच साथीदारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत मोकाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये टोळीप्रमुख उमेश मुकेश वाघमारे (वय २४), मंदार संजय खंडागळे (वय २१), आदित्य लक्ष्मण बनसोडे ऊर्फ भुंड्या (वय १९) गणेश मारुती शिकदार (वय १९), विनायक ऊर्फ नंदू सुनील शिंदे (वय २२) आणि एक फरारी आरोपीचा समावेश आहे.

आरोपी उमेश वाघमारे आणि त्याच्या साथीदारांनी २४ नोव्हेंबर रोजी शुक्रवार पेठेतील एका व्यक्तीकडे खंडणीची मागणी केली होती. परंतु त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, शस्त्रांचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी खडक पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले होते.

त्यानुसार या टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT