Anil Shirole 
पुणे

Loksabha 2019 : पक्षाचा निर्णय मान्य, बापट यांचा प्रचार करू : अनिल शिरोळे

सकाळवृत्तसेवा

पुणे :  देशातील कोट्यवधी भाजप कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. पक्षाने उमेदवारीबाबत घेतलेला निर्णय मान्य असून, गिरीश बापट यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करू, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली.  

 "मी 1992 पासून भाजपचा कार्यकर्ता आहे, नगरसेवक होते, विरोधी पक्षनेता, शहराध्यक्ष म्हणून जबाबदारीही पार पाडली. पक्षाने मला खासदार होण्याचीही संधी दिली. पक्ष आता जो आदेश दिला आहे तो मला मान्य आहे. गिरीश बापट यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून त्यांना निवडून आणण्यासाठी काम करेन, असे शिरोळे यांनी म्हटले आहे. भाजपने पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी न देता पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील अनेक कामे केंद्र सरकारकडून मार्गी लावली, पण पक्ष काय विचार करतो हे महत्वाचे आहे. देशाला कधी नव्हे ते नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. देशाची प्रगती होत असताना भाजपच्या ११ कोटी कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे.  पुर्वीपासून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, तसेच काम पुढे ही करत रहाणार. उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असतात, पण उमेदवारी एकालाच मिळते. गिरीश बापट यांना उमेदवारी मिळाली आहे,  त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू,  अशी भावना शिरोळे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

SCROLL FOR NEXT