पुणे

वारज्यात बेकादेशीर बांधकामावर पुणे महापालिकेची कारवाई

राजेंद्रकृष्ण कापसे

वारजे माळवाडी : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वारजे- कर्वेनगर मुख्य रस्त्यावरील बेकादेशीर बांधकामावर केलेल्या सहा व्यावसायिक दुकानांवर शुक्रवारी कारवाई केली. यामध्ये सुमारे तीन हजार चौरस फूट जागा रिकामी केली आहे. तासभर झालेल्या कारवाईत स्थानिकांचा विरोधास न जुमानता मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केले.

वारजे जुना जकात नाका येथील सर्व्हे नंबर १७ (भाग) व हिंगणे सर्व्हे न ५१ (भाग) मध्ये महापालिकेच्या समाज कल्याण विकास कार्यालयासमोर अनेक बेकायदा टपर्‍या मागील दहा- बारा वर्षापासून सुरु होत्या. याबाबत वारंवार नोटिसा देऊनही येथील अतिक्रमण धारक टपऱ्या काढत नव्हते. वारजे- कर्वेनगर मुख्य रस्त्यालगत असलेल्या जागेचा व्यावसायिक वापर होत होता. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतरची हि पहिली कारवाई होती.

महापालिकेचे तीन कनिष्ठ अभियंता, उपअभियंता दोन पोलीस उपनिरीक्षक दोन जेसीबीसह व सुमारे तीस जणांचा फौजफाट्यासह महापालिकेचे अतिक्रमण कारवाई केली. ही कारवाई उपअभियंता देवेंद्र पात्रे यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, विठ्ठल मुळे, संग्राम पाटील, सचिन जावळकर, अजित ववले यांनी केली. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर खटके निरीक्षक अमृत मराठे यांच्या सोबत सुमारे ४० पोलीस कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT