Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Pune Municipal Budget : पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मुहूर्त लागेना

पुणे महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प करण्यासाठी विभागनिहाय बैठका झाल्या असल्या तरी अद्याप अंतिम स्वरूप आलेले नाही.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - पुणे महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प करण्यासाठी विभागनिहाय बैठका झाल्या असल्या तरी अद्याप अंतिम स्वरूप आलेले नाही. जमा आणि खर्चाचे आकडे जुळविण्याचे कामही शिल्लक आहे. असे असताना आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार हे अर्थसंकल्प कधी मांडणार? याबाबत अधिकाऱ्यांना देखील याबाबत काहीच माहिती नाही.

पुणे महापालिकेने यापूर्वी झालेल्या ठरावानुसार आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणे आवश्‍यक असते. त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांच्या अधिकारात त्यामध्ये बदल करून सुधारित अर्थसंकल्प मुख्यसभेच्या मान्यतेसाठी सादर करतात. त्यावर नगरसेवकांमध्ये चर्चा झाल्यानंतर मुख्यसभेची मार्च महिन्यात अंतिम मान्यता मिळते अशी सर्वसाधारण प्रक्रिया आहे.

मात्र, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिकेत नगरसेवक असताना देखील अर्थसंकल्प मांडण्यास विलंब केला होता. त्यानंतर सलग दोन वर्ष प्रशासक राजवटीतच अर्थसंकल्प मांडला गेला असल्याने त्यावर संपूर्णपणे प्रशासक म्हणून आयुक्तांचेच नियंत्रण आहे.

फेब्रुवारी महिन्यात आयुक्तांनी अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सर्व विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. पण त्यापुढे काही झालेले नाही. लेखा व वित्त विभागातील काही कर्मचाऱ्यांनी अर्थसंकल्पाचे बरेच काम शिल्लक आहे, अद्याप जमा व खर्चाचे आकडे जुळलेले नाहीत असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तर नगरसचिव कार्यालयाला अद्याप अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडण्यासाठी पत्र देण्यात आलेले नाही.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वी अर्थसंकल्प स्थायी समिती व मुख्यसभेत मंजूर होणे आवश्‍यक आहे. दरम्यान स्थायी समिती आणि मुख्यसभा ही आयुक्तांच्याच ताब्यात नसल्याने चर्चेशिवाय अर्थसंकल्प मंजूर होणार आहे. त्यामुळे यास वेळ लागणार नाही, असा दावा अधिकारी करत आहेत. यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

मुख्यसभेच्या ठरावानुसार १५ जानेवारीपर्यंत आयुक्तांनी अर्थसंकल्प मांडणे आवश्‍यक आहे. तसेच अर्थसंकल्प मांडताना आणि मांडल्यानंतर त्यामध्ये पारदर्शकता नाही. अर्थसंकल्प ऑनलाइन टाकण्यास टाळाटाळ केली जाते.

शहराला नगरसेवक, खासदार नसताना आयुक्तांनी अधिक जबाबदारीने याचे पालन करणे आवश्‍यक होते. पण तशी स्थिती नाही. आमदारही याबाबत काहीच करत नाहीत.

- तन्मय कानिटकर, परिवर्तन संस्था

ऑनलाइन अर्थसंकल्प हवाच

महापालिकेचा अर्थसंकल्प थेट नागरिकांवर परिणाम करणारा असतो. त्यांच्या भागात कोणती कामे पुढील वर्षभरात होणार हे त्यांना त्यातून कळते. पण गेल्या दोन वर्षापासून अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची प्रत ऑनलाइन टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींना यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. तरीही स्मार्ट महापालिका त्यास दाद देत नाही, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT