online form sakal
पुणे

Engineer Recruitment : कनिष्ठ अभियंता भरतीसाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरता येणार

पुणे महापालिकेत ११३ कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) जागा भरण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेत ११३ कनिष्ठ अभियंत्यांच्या (स्थापत्य) जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांची भरतीची प्रक्रिया महापालिकेने राबविली होती. त्यासाठी तीन वर्षाची अनुभवाची अट असताना देखील सुमारे १२ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केले होते. ही भरतीची प्रक्रिया पूर्ण करून त्याची प्रतिक्षायादीची मुदत नुकतीच संपली. त्यानंतर आता ११३ जागांची भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

११३ जागांपैकी १३ जागा या माजी सैनिकांसाठी आरक्षीत असणार आहेत. तर उर्वरित १०० जागा या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत. या भरतीसाठी अनुभवाची अट काढण्यात आल्याने नुकतेच पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.

यासाठी अर्ज भरण्याची मुदत १६ जानेवारीपासून सुरु होत आहे. तसेच याचे नियम व अटी इत्यादी माहिती याच तारखेपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT