पुणे

प्रशासनाचे टोचले कान

CD

महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती न होणे त्यांना चांगले खाते न देणे यासह त्यांच्याशी अपमानास्पद वागणे असे प्रकार वाढत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती दिली जात नाही, हे वागणे बरोबर नाही. यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, अशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे सर्वसाधारण सभेत कान टोचले, तसेच महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांचा ठराव सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी आणावेत, ही पद्धत पुन्हा एकदा सुरू करा, असे आदेश महापौर मंजूषा नागपूरे यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांना दिले. दरम्यान, राम यांनी अतिरिक्त आयुक्त पदासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
--------------
भाजपविरुद्ध बालवडकर पुन्हा संघर्ष
पुणे महापालिका सभागृहामध्ये डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची दरवर्षी जयंती साजरी केली जावी, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी आला होता. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी त्याला उपसूचना दिली. त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा उल्लेख करत त्यांचे तैलचित्र महापालिकेत बसवावे, अशी उपसूचना दिली, तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल नवीन सदस्यांना माहिती व्हावी, यासाठी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभागृह दहा मिनिटे भाषण करावे, असे सुचवले. बालवडकर यांच्या या सूचनेमुळे भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. ‘तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींचा अपमान करत आहात का?’ असा जाब विचारत त्यांच्या कृतीचा निषेध केला. यावरून पुन्हा एकदा भाजप विरुद्ध बालवडकर असा संघर्ष दिसला. दरम्यान, विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी मध्यस्थी करत ही उपसूचना मागे घेतली आणि मूळ ठराव मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT