Pune Nashik Highway Accident sakal
पुणे

Pune Accident: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर 5 तासानंतर रस्त्यातील ट्रेलर बाजूला; वाहतूक पूर्ववत

पुण्याहून नाशिककडे जात असताना कारला वाचविताना टेलर चालकाचा ताबा सुटल्याने भोरवाडीच्या पुलानजीक टेलर पलटी झाला होता.सकाळी नऊ वाजता मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी आले. पण मोठ्या क्षमतेचा क्रेन उपलब्ध होण्यास विलंब झाला.

डी.के वळसे पाटील

Pune Accident - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भोरवाडी- अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.५) सकाळी सात वाजता पुण्याहून नाशिककडे जाणारा चाळीस फूट लांबीचा ट्रेलर (एच आर ४७ सी २३१८) रस्त्यातच मध्यभागी पलटी झाला.

त्यामुळे पुणे व नाशिकला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.मंचर पोलिसांनी दोन क्रेनची व्यवस्था केल्याने शुक्रवारी दुपारी पावणेबारा वाजता रस्त्यातून ट्रेलर बाजूला करण्यात यश आले. तब्बल पाच तासानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आटोक्यात आली आहे.

पुण्याहून नाशिककडे जात असताना कारला वाचविताना टेलर चालकाचा ताबा सुटल्याने भोरवाडीच्या पुलानजीक टेलर पलटी झाला होता.सकाळी नऊ वाजता मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी आले. पण मोठ्या क्षमतेचा क्रेन उपलब्ध होण्यास विलंब झाला.

क्रेन व्यावसायिक बादशहा इनामदारदोन क्रेन उपलब्ध करून दिले.तब्बल अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झालेला टेलर रस्त्यातून बाजूला काढण्यात यश आले. अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हेमंत मडके यांनी दिली.दरम्यान वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याने वाहनचालक व प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT