पुणे

Pune Crime : पबमध्ये राष्ट्रध्वज भिरकावला; राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल

कोरेगाव पार्कमधील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये रविवारी (ता.१३) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका पबमध्ये गायिकेने राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये भिरकावल्याने तिच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरेगाव पार्कमधील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये रविवारी (ता.१३) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

गायिका उमा शांती आणि कार्तिक मोरे (रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार तानाजी देशमुख (वय ४५) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये कार्तिक मोरे याने स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. शांती पिपल म्युझिक बँडमधील गायिका उमा शांती हिने गाताना दोन्ही हातात राष्ट्रध्वज घेतला होता.

राष्ट्रध्वज हातात धरुन ती नाचत होती. तिने प्रेक्षकांमध्ये राष्ट्रध्वज भिरकावला. त्यानंतर हातवारे करून असभ्य वर्तन केले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT