निरोप  sakal
पुणे

Pune : कानिफनाथ गडांवर मद्यपिंना ट्रेकर्सकडून पर्यावरणाचा संदेश

सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर भल्या पहाटे कानिफनाथ गडावर ट्रेकर्स मंडळींनी

अशोक बालगुडे

उंड्री : सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर भल्या पहाटे कानिफनाथ गडावर ट्रेकर्स मंडळींनी नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. गडावरील पायवाटेच्या बाजूला झिंगणाऱ्या मद्यपींना उठवले. बाबांनो दारू संपत नाही, दारू तुम्हाला आणि परिवाराला संपवते. आजपासून नव्हे, आतापासून मद्य सोडा, गोजिरवाण्या चिमुकल्यांबरोबर गोड संसार करा, आरोग्य सांभाळा असा संदेश डॉ. अनिल पाटील यांनी दिला.

याप्रसंगी वर्षा पाटील, मोहन मोरे, अरुणी मोरे, श्रीविष्णू अष्टेकर, राजेश माळदर, विष्णू जाधव, मोहन गुरव, अक्षय भाईजी, मनस्वी निकम, प्रवीण भाईजी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले की, मागिल वर्षी लागवड करून, त्यांचे संगोपन केल्याने ती वाढल्याचे पाहून समाधान वाटत आहे. स्वतःच्या शरीराबरोबर निसर्गाची निगा राखता राखता पर्यावरणाशी मैत्री केली. ट्रेकर्सच्या माध्यमातून ट्रॅकर ग्रुप काम करीत आहे. आरोग्य सांभाळण्यासाठी आपण दररोज ट्रेकिंगला येता, तर काहीजण आठवड्यातून एकदा येतात.

कानिफनाथ गड, पायवाट, पाण्याचे झरे, हिरवीगार झाडी फुलवा आणि पर्यावरणाशी मैत्री घट्ट करा. तसेच, आज नव्या वर्षाची सुरुवात कानिफनाथ गडावर पहाटेचा ट्रेक करून केली आज जाणवलेले एक विशेष बाब म्हणजे प्रत्येक रविवारी ट्रेकिंगसाठी येणारी मंडळी सरत्या वर्षाला निरोप देण्यात व्यस्त राहिली आणि नव्या वर्षाचे स्वागत करायला विसरून गेली आम्ही मात्र नेहमीप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात पर्यावरणाच्या सानिध्यात आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेऊन केली

आज आम्हाला गडावर जाताना बरीच मंडळी सरत्या वर्षाच्या धुंदीतच आढळून आली सरत्या वर्षाला निरोप द्यावा हे खरे पण नव्या वर्षाचे स्वागत सुद्धा एका चांगल्या विचाराने तुमच्या आवडत्या लोकांसोबत पर्यावरणाच्या सानिध्यात केलं तर हे येणार फक्त एकच नवीन वर्ष नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांची नवीन वर्ष सुखा समाधानात जातील, असा संदेश दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, गडावर झिंगणाऱ्या मंडळींना डॉक्टरांनी सांगितलेलं पटलं आणि आज नव्हे आतापासून मद्य बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या वर्षी आम्ही तुमच्याबरोबर येऊ, दर आठवड्याला आल्यानंतर झाडी जगविण्यासाठी बाटलीभर पाणी आणणार आणि झाडांना घालून ते जगवणार, फुलवणार असे सांगितल्याचे प्रवीण भाईजी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

Jarange Audio Clip: ''500 कोटींचं सोडा.. जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?'', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, जवळची माणसं फोडून...

Marathi News Live Updates:साताऱ्यात मतदानादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे समोरासमोर, हस्तांदोलनासह मिश्किल टोलेबाजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताय? चुकीचा रंग आणू शकतो गरिबी! घर रंगवताना नक्की पाळा वास्तूचे 'हे' नियम...

SCROLL FOR NEXT