Accident 
पुणे

वाहतूक पोलीस चौकीच्या उद्घाटनाच्या दिवशीच नवले पुलावर अपघात; सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरची कारला धडक

विठ्ठल तांबे

धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  त्याच ठिकाणी ११.३० च्या सुमारास दुसरा अपघात झाला आहे.

नवले पुल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात घडत आहेत. प्रशासनाकडून हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला आहे. तसेच अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात येथे उपाययोजनाही करण्यात आल्या. तरीही या परिसरातील अपघाताचे सत्र मात्र काही केल्या थांबायला तयार नाही. महामार्गावर हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या.

सिंहगड रस्ता वाहतूक  विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली आहे.  या परिसरात सातत्याने अपघात घडत असून बुधवारी देखील कंटेनर व ट्रकचा अपघात या परिसरात झाला होता. यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला होता.

अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस चौकीचे आज उद्घाटन

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या वतीने नवीन कात्रज बोगद्याजवळ पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या नव्या वाहतूक पोलीस चौकीचे आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

Protest News: एसआयआर’ रद्द करा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या; दिल्लीतील आंदोलनात आंदोलकांच्या जोरदार घोषणा

SCROLL FOR NEXT