हुबेहुब सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा वाटायला हवी Sakal
पुणे

Pune News : हुबेहुब सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा वाटायला हवी; छगन भुजबळ

भिडे वाडा स्मारक उभारणीबाबत छगन भुजबळ यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा

Pune News: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक उभारताना येथे सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली मुलींची पहिली शाळा ही त्या काळातील सावित्रीबाईंच्या शाळेप्रमाणे हुबेहूब दिसली आणि वाटली पाहिजे.

यासाठी जुन्या व नवीन अशा दोन्ही काळाची सांगड घाला, अशी सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता.१०) पुणे महापालिकेला केली. या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सावित्रीबाईंनी ज्या भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली, त्या ठिकाणी आता सावित्रीबाई यांचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकाच्या संभाव्य कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी भुजबळ यांनी आज बैठक घेतली.

या बैठकीत बोलताना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीला यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश सूळ, महापालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले, ‘‘भिडे वाडा येथे सावित्रीबाईंचे राष्ट्रीय स्मारक उभारताना तेथील शाळा ही 'सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा' अशी वाटली पाहिजे, अशा पद्धतीने ती तयार करा. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदांकडून विविध प्रकारचे आराखडे तयार करून घ्या.

या आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्या पद्धतीचा दर्शनी भाग आदींचा समावेश असला पाहिजे. शिवाय जागेचा विचार करता, शाळेच्या इमारतीत उदवाहकाची (लिफ्ट) व्यवस्था करावी.’’

स्मारक उभारणीबाबत प्रमुख सूचना

- या परिसरात वाहनतळाची अन्यत्र व्यवस्था करण्याच्या दृष्टीने चाचपणी करावी.

- या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्या दृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत पालिकेने चाचपणी करावी.

- स्मारक समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर प्रत्यक्षात लवकरात लवकर काम सुरु करा.

- स्मारक पाहून अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल,अशी बांधणी व्हायला हवी.

- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक ते भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारक यांना जोडणाऱ्या मार्ग त्वरित आरक्षित करावा

- मार्ग आरक्षणाचे काम नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे

- रस्ता आरक्षण निश्चितीनंतर पुणे महापालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी

- रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी

- नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार केला जावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT