Bullet-Train 
पुणे

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुण्यापर्यंत?

सकाळवृत्तसेवा

पुणे - मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणारी बुलेट ट्रेन पुण्यापर्यंत आणण्याच्या प्रस्तावावर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) विचार करीत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून समजले. ही ट्रेन पुण्यापर्यंत आल्यास पुणे ते मुंबई अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येईल.

मुंबई-अहमदाबाददरम्यानची नियोजित बुलेट ट्रेन किमान 300 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. हा मार्ग अहमदाबादवरून साबरमतीपर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु मुंबईवरून पुण्यापर्यंत मार्ग वाढविल्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळू शकतो. तसेच अहमदाबादवरून पुण्याला ये-जा करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे.

त्यामुळे या ट्रेनचा फायदा पुणे, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांतील प्रवाशांना मिळू शकतो, असे प्रस्तावात म्हटले आहे. याबाबत हायस्पीड रेल कॉर्पोरेशन गांभीर्याने विचार करीत आहे. त्याबाबत सर्वेक्षण करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 लाख कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनचे काम मिळावे म्हणून चीन, फ्रान्स, स्पेन, जपान, दक्षिण कोरियामधील अनेक कंपन्या इच्छुक आहेत. ही बुलेट ट्रेन पुण्यावरून मुंबईला जाताना फक्त वडाळा येथे थांबेल, असेही प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे पुणे ते छत्रपती शिवाजी स्थानक हे अंतर किमान 30 मिनिटांत कापले जाऊ शकते. याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, ""बुलेट ट्रेन पुण्यापर्यंत येणे गरजेचे आहे. पुण्यातून अहमदाबाद आणि तेथून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनही या प्रस्तावावर विचार करीत आहे. आता पुण्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यास पुणे-मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन शक्‍य होईल.'' या प्रस्तावाला मध्य रेल्वेच्या मुंबईतील सूत्रांनीही दुजोरा दिला आहे. मात्र, तपशील नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज! कोणती बँक देते सर्वात स्वस्त कर्ज? पात्रता, व्याजदर आणि अर्जाची संपूर्ण माहिती

BAN vs CA XI : बांगलादेशचा संघ ५४ धावांत तंबूत! ऑस्ट्रेलियन Campbell Thompson ने घेतल्या ८ विकेट्स; कसोटी मॅच डावाने जिंकली

Ichalkaranji Firing Incident : कबनूरमध्ये रील बनवणं बेतलं जीवावर! हवेत फैरी झाडताना गोळी थेट कवटीत घुसली, रक्तबंबाळ होऊन नीलेश जागीच कोसळला

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये FDAची मोठी कारवाई! ५ उद्योगांवर धाड; १,९४,५०,९२२ किंमतीचे तेल जप्त

मुंबईत भररस्त्यात बर्थडेचा धिंगाणा! बोनेटवर केक कटिंग अन् एअरगनने गोळीबार, भाजप कार्यकर्त्यासह १० जणांना अटक; Video Viral

SCROLL FOR NEXT