पुणे

शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे

सकाळवृत्तसेवा
हैदराबाद पाचव्या, तर बंगळूर पहिल्या स्थानावर; 'जेएलएल'चे मूल्यांकन
पुणे - सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुण्याने तेरावे स्थान पटकावले आहे. पुण्याप्रमाणेच हैदराबाद पाचव्या स्थानावर, तर बंगळूर पहिल्या स्थानावर आहे. जगभरातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे हे मूल्यांकन "जेएलएल' या अमेरिकी गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीने केले आहे.

सिटी मोमेन्टम इंडेक्‍स म्हणजे काय?
एखाद्या शहराची अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक बांधकाम बाजाराची स्थिती याचे मूल्यांकन म्हणजे "सिटी मोमेन्टम इंडेक्‍स'. जगभरातील 134 प्रमुख प्रस्थापित व उदयोन्मुख व्यावसायिक केंद्रांचा या "सीएमआय'मध्ये विचार केला गेला आहे. त्यासाठी सामाजिक आर्थिक गती, व्यावसायिक बांधकाम बाजाराची गती आणि नावीन्यता, पर्यावरण व शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन विकास गती हे तीन निकष लावण्यात आले आहेत.

भारताचे वैशिष्ट्य
जगातील सर्वाधिक "डायनॅमिक सिटी' म्हणजे वेगाने बदलणारी शहरे असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. या बाबतीत आपल्या देशाने चीनला मागे टाकले आहे. देशांतर्गत शहरांमध्ये बंगळूर शहराने प्रथम क्रमांक, तर हैदराबादने दुसरा आणि पुण्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ चेन्नई, दिल्ली व मुंबईचा क्रमांक लागतो.

वेगाने बदलणाऱ्या शहरांमध्ये पुणे 13 क्रमांकावर
सर्वाधिक वेगाने बदलणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याचा 13 वा क्रमांक आहे. या श्रेणीमध्ये दिल्ली व मुंबई तसेच न्यूयॉर्क, बिजिंग, सिडनी आणि पॅरिस या शहरांना पुण्याने पिछाडीवर टाकले आहे. लोकसंख्या, दळणवळण, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण, बांधकाम, गुंतवणूक, सदनिका व कार्यालयांच्या किमती, कॉर्पोरेट उपक्रम आणि अर्थव्यवस्था या दहा निकषांवर शहरांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे.

धोक्‍याचा इशारा
पुण्याने अन्य शहरांना मागे टाकले असले तरी दीर्घकालीन परिस्थितीचा विचार करता शहराचा बदलाचा वेग कायम राहील किंवा नाही याबाबत साशंकता आहे. सामाजिक-आर्थिक बदलाची गती आणि व्यावसायिक बांधकाम क्षेत्रातील बदलाची गती आश्‍वासक आहे मात्र दीर्घकालीन बदलाच्या गतीचे चित्र सकारात्मक नसल्याचे इंडेक्‍समध्ये नमूद करण्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT