Crime Sakal
पुणे

तडीपार गुंडासह नऊ जणांच्या टोळीवर पुणे पोलिसांकडून "मोक्का'ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्रांनी वार (Attack) करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (ताडीवाला रोड) परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार गुंडासह (Tadipar Gund) त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोक्का) (Mokka) कारवाई (Crime) करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली "मोक्का'ची 30 वी कारवाई असून मागील चार महिन्यातील 25 वी कारवाई आहे. (Pune Police Crime on gang of nine including Tadipar Gund)

तडीपार गुंड सुलतान ऊर्फ टिप्या लतीफ शेख, विनोद ऊर्फ विन्या सुनिल वाघमारे, साहील उर्फ सोन्या राजु वाघमारे, श्‍याम किशोर काळे, शुभम अनिल धिवार, रामनाथ उर्फ पापा मेनीनाथ सोनवणे, सागर उर्फ सॉगी किशोर गायकवाड, अनिकेत किशोर खंदारे, सौरभ तिमाप्पा धनगर आणि अतुल श्रीपास म्हस्कर उर्फ सोनु परमार अशी "मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून टोळीप्रमुख लतीफ शेख अद्यापही फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलीफ शेख यास बंडगार्डन पोलिसांनी तडीपार केले आहेत. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन गौरव पुजारीच्या खुनाचा प्रयत्न केला. त्याने टोळीच्या वर्चस्वासाठी व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केलेले आहेत. त्याच्या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र बाळगणे, दरोड्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी त्यांच्यावर "मोक्का'अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या मोक्काच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. गुन्ह्याचा तपास लष्कर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत सांगळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ सिल्लोडमध्ये मराठा समाज आक्रमक; बैलगाड्या जनावरांसह तासभर रास्तारोको

'लक्ष्मी निवास' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; जान्हवीच्या आयुष्यात नव्या संकटाची चाहूल; कोण आहे ही?

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंनी उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांची घेतली भेट

Supriya Sule on Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

SCROLL FOR NEXT