pune police foot massage from driver video at kalyaninagar naka-bandi video goes viral marathi news  
पुणे

Pune Police News : पोलिसाची मुजोरी?कल्याणीनगर येथे नाकाबंदीदरम्यान तरुणाकडून चेपून घेतले पाय, नंतर दिलं स्पष्टीकरण

Pune News : कल्याणीनगर अपघात प्रकरण हाताळताना झालेल्या चुका आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन यामुळे येरवडा पोलीस ठाणे अगोदरच चर्चेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : कल्याणीनगर अपघात प्रकरण हाताळताना झालेल्या चुका आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन यामुळे येरवडा पोलीस ठाणे अगोदरच चर्चेत आहे. त्यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. नाकाबंदी दरम्यान एका युवकाकडून येरवड्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने पाय चेपून घेतल्याचे उघडकीस आले आहे.

कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुणे शहर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातील रेस्टॉरंट, बार, पब पोलिसांच्या रडारवर आले. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या विरोधात पोलिसांनी नाकाबंदीची मोहीम सुरू केली. येरवडा पोलीसही कल्याणी नगर आणि नगर रस्ता परिसरात नाकाबंदी करीत आहेत. या दरम्यानच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येरवडा पोलिसांकडून शनिवारी रात्री कल्याणी नगर चौकात नाकाबंदी करण्यात आलेली होती. यादरम्यान तपासणीसाठी थांबवलेल्या एका युवकाकडून उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने स्वतःचे पाय चेपून घेतले, अशी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली.

येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोरडे हे त्या ठिकाणी नाकाबंदीला उपस्थित असल्याचे समजते. या व्हिडिओ क्लिप मुळे पोलीस दलात पुन्हा खळबळ उडाली असून आणखी एक प्रकरण समोर आल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यावर कोणती भूमिका घेतात याविषयी उत्सुकता आहे.

याविषयी येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश संके म्हणाले, नाकाबंदी दरम्यान आमच्या विभागाचे उपनिरीक्षक अशोक गोरडे त्या ठिकाणी होते. नेमके काय प्रकरण घडले याची माहिती मी घेत आहे.

येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गोरडे म्हणाले, मी सलग दोन दिवस रात्रपाळी केली. दिवस पाळी केली. रात्री कल्याणी नगर येथे नाकाबंदी करत असताना माझ्या पायाला गोळा आला. म्हणून मी खुर्चीवर बसलो होतो. त्यावेळी तिकडून जाणाऱ्या दोन तरुणांनी काय झाले याची चौकशी करीत पाय दाबून देऊ का अशी विचारणा केली. मी हो म्हटल्यानंतर त्याने पाय चोळून दिला. तपासणी दरम्यान पकडलेल्या तरुणांकडून पाय दाबून घेतल्याचा आरोप चुकीचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT