Pune Porsche Accident Esakal
पुणे

Pune Porsche Accident: आम्ही आमची मुलं मोठी होत नाहीत पर्यंत...', पुणे अपघातात मुलगी गमावल्यानंतर वडिलांचा राग अनावर

Ashwini Costa: दरम्यान या प्रकरणी आरोपीला एकाच दिवसात बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. तर आज अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे.

आशुतोष मसगौंडे

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्ववयीन मुलाच्या कारच्या धडकोत मृत्युमुखी पडलेल्या अश्विनी कोष्टा या तरुणीचे वडील सुरेश कोष्टा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुरेश कोस्टा यांनी मंगळवारी आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत घटनेनुसार आरोपींवर कारवाई व्हावी, जेणेकरून लोक यातून धडा घेतील, असे म्हटले आहे. सुरेश कोष्टा पुढे म्हणाले की, आम्ही आमची मुले मोठी होईपर्यंत त्यांना वाहनांना हात लावू दिला नव्हता.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अश्विना कोस्टाचा मोठा भाऊ समर याने सांगितले की, ती गेल्या सहा वर्षांपासून पुण्यात होती. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपासून ती पुण्यात नोकरी करत होती. आमच्या कुटुंबात ती वडिलांची लाडकी होती.

19 मे रोजी भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने एका दुचाकीला मागून धडक दिली होती. यामध्ये अनिश अवधिया आणि अश्विना कोस्टा यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान या प्रकरणी आरोपीला एकाच दिवसात बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला होता. तर आज अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती?

पंतप्रधान मोदी ६ दिवस युरोप दौऱ्यावर; UAE, इटलीसह ५ देशांना देणार भेट

Satej Patil Vinay Kore Gokul politics : विनय कोरेंनी सतेज पाटलांची गोकुळमधील साथ सोडली; महायुतीचे पॅनेल करण्यावर भूमिका स्पष्ट

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

Pimpalgaon Joga Canal: पिंपळगाव जोगा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया, २५ एकर शेतीचे मोठे नुकसान, जुन्नरमध्ये कालवा फुटीचा थरार..

SCROLL FOR NEXT