porsche motors pune accident esakal
पुणे

Pune Porsche Accident : चालकाचे अपहरण, गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव.. अल्पवयीन मुलाच्या आजोबाला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

सनिल गाडेकर

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबांना न्यायालयाने २८ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवल्याबाबत मुलाच्या आजोबाला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सुरेंद्रकुमार अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाच्या आजोबाचे नाव आहे. शनिवारी (ता. २५) सकाळी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यासह मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर देखील याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना दुपारी तीन वाजता सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दरम्यान, याच प्रकरणामध्ये शुक्रवारी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचा समावेश आहे. तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते.

दुसरीकडे शुक्रवारीच या प्रकरणात तपास अधिकारी बदलला आहे. पोलिस अधिकारी आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे अपघात प्रकरणाचा तपास देण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT