Pune Porsche Accident  Esakal
पुणे

Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीच्या पार्टीसाठी ४८ हजार नव्हे 'इतका' झाला खर्च; चौकशीत नवा खुलासा

अपघाताच्या दिवशी मुलासोबत पार्टीला असणाऱ्या १५ मुलांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाबरोबर अपघाताच्या दिवशी दोन वेगवेगळ्या क्लबमध्ये दोन वेगवेगळे ग्रुप पार्टीसाठी आले होते. पार्टीच्या खर्चासाठी प्रत्येक मुलाने अडीच हजार रुपये दिले होते. तर उर्वरीत रकमेचे बिल अल्पवयीन मुलाने दिले होते. ते बिल ४८ हजार रुपयांचे होते, असे पोलिस तपासातून समोर आले आहे.

अपघाताच्या दिवशी मुलासोबत पार्टीला असणाऱ्या १५ मुलांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत मुलांनी पार्टीसाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिल्याची माहिती दिली. तर ससून रूग्णालयातील डॉ. अजय तावरे अधीक्षक असलेल्या न्याय वैद्यक विभागातील नर्स व कर्मचाऱ्यांची रक्ताचे नमुने बदलण्याच्या अनुषंगाने चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्याबरोबरच बुधवारी (ता.१२) वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव यांचा देखील जबाब नोंदवत गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली.

आर्यनची सायबर पोलिसांत हजर

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला जामीन मिळाल्यानंतर अश्लील भाषेत संवाद साधणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलानेच तो व्हीडिओ केल्याची अफवा सुरुवातीला पसरली होती. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासात हा व्हिडिओ मूळच्या मध्यप्रदेशातील व सध्या दिल्लीत राहत असलेल्या आर्यन नावाच्या मुलाचा असल्याचे समोर आले होते. हा व्हिडिओ शुभम शिंदे याने व्हायरल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना नोटीसा बजावल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर आर्यनने समाज माध्यमावर प्रतिक्रिया देत पुन्हा पुणे पोलिसांवर टीका देखील होती. मागील आठवड्यात आर्यन हा त्याच्या वकिलांमार्फत सायबर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्याच्याकडे चौकशी करून त्याला परत पाठविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT