Pune Accident 
पुणे

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

पब, हॉटेलमध्ये खातरजमा न करता मुलांना मद्य विक्री करण्यात असल्याचे उघडकीस आले आहे.

सनील गाडेकर

पुणे, ता. २१ ः विमाननगर येथे झालेला अपघात अत्यंत गंभीर आहे. त्या अपघातात दोघांचे बळी गेले आहेत. पब, हॉटेलमध्ये खातरजमा न करता मुलांना मद्य विक्री करण्यात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांबाबत पब चालकांनी तपासणी केली पाहिजे. पब चालविणे गंमत आहे का? पुरेशी यंत्रणा नसेल तर पब चालवू नका, असे खडेबोल सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावले.

पबमध्ये येणारी व्यक्ती मोटारीने, स्वतःच्या कोणत्याही वाहनाने परत जाणार आहे. ते गाडी चालविणार आहेत. मद्यपान केल्यानंतर त्यांच्याकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पबमध्ये येणारी व्यक्ती खूप प्यायली असेल तर तेथेच त्याच्या झोपण्याची सोया करा. मद्यपान आणि त्यानंतर होणारा अपघात किंवा इतर कोणत्याही गैरप्रकारात बदल झाला पाहिजे. अन्यथा किती दारू द्यायची याची मर्यादा ठरावा, असे न्यायाधीश पोंक्षे सुनावणी दरम्यान म्हणाल्या.

मुद्दाम तकलादू स्वरूपाची कलमे लावण्यात आली

या प्रकरणात ॲड. असीम सरोदे आणि ॲड. श्रिया आवले यांनी सारंग यादवाडकर यांच्यामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. एकाच अपघाताच्या घटनेसाठी दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करणे ही पोलिसांनी मुद्दाम केलेली चूक आहे. जर पब चालकाने अल्पवयीन मुलाला दारू पिण्याची परवानगी दिली नसती तर त्याने बेधुंद पद्धतीने कार चालवून दोघांचा जीव घेणारा अपघात केला नसता. अपघाताच्या या प्रकरणात मुद्दाम तकलादू स्वरूपाची कलमे लावून गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असा युक्तिवाद ॲड. सरोदे यांनी केला. पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा कायद्यासमोर समानता या तत्वाला पायदळी तुडविणारा आहे. श्रीमंत व्यक्तीच्या मुलाला वेगळा न्याय देण्याची प्रक्रिया आहे, असे पोलिसांचे वागणे असल्याचे ॲड. सरोदे म्हणाले.

न्यायालयाने नमूद केलेले महत्त्वाचे मुद्दे

- पब, हॉटेलमध्ये खातरजमा न करता मुलांना मद्य विक्री केली जात आहे

- अल्पवयीन मुलांची पब चालकांनी तपासणी केली पाहिजे

- पुरेशी यंत्रणा नसेल तर पब चालवू नका

- पबमध्ये येणारी व्यक्ती वाहन चालवत घरी जाणार लक्षात घ्यावे

- पबमध्ये येणारी व्यक्ती खूप प्यायली असेल तर तेथेच त्याच्या झोपण्याची सोया करावी

- किती दारू द्यायची याची मर्यादा ठरावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT