Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत  sakal
पुणे

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. या अपघात प्रकरणी सर्व आढावा त्यांनी यावेळी घेतला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. या अपघात प्रकरणी सर्व आढावा त्यांनी यावेळी घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, हा अपघात अंत्यत गंभीर होता. पोलिसांनी या अपघाताबाबत सर्व पुरावे दिले आहेत. पोलिसांनी कलम ३०४ लावलेले आहे. या अपघातानंतर लोकांमध्ये संताप दिसून येत आहे. तर बाल न्याय मंडळाची भूमिका सरकारच्या मनात प्रश्न निर्माण करणारी आहे, असंही फडणवीस यावेळी बोलताना म्हणालेत.

पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले आहेत. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही अर्ज रिमांडचा सबमिट केला होता, त्यात अतिशय स्पष्टपणे कलम 304 नमूद केलेलं आहे. स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा जो मुलगा आहे तो 17 वर्षे 8 महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं, आणि 16 वर्षाच्या वरचे जे मुलं असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. रिमांड अॅप्लिकेशनही माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे”, असं फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणालेत.

“या अपघातात प्रकरणात पोलिसांनी पुरावे दिले आहेत. कोणत्या हॉटेलात गेला, काय केलं, वयाचे पुरावे दिले आहेच, गाडीचे पुरावे दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि दुरुस्ती दिल्यानंतर ज्युवेनाईल बोर्डाने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. त्यामुळे वरच्या कोर्टात अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात सांगितलं की या बाबत ज्युवेनाईल कोर्टात जावं लागेल. या कायद्यात त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार ज्युवेनाईल बोर्डाला आहे. त्यांनी नाही केलं तर आमच्याकडे या. आम्ही अर्ज केला. आज किंवा उद्या या ऑर्डरवर सुनावणी होईल. वरच्या कोर्टाचा दृष्टीकोण पाहता ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड ऑर्डर देतील. नाही दिली तर आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. या प्रकरणात जिथ पर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची तयारी आहे”, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुणे पोलीस बाल न्याय मंडळाविरोधात न्यायालयात न्याय मागतील. अपघाताच्या प्रकरणामध्ये ३०४ कलम लावण्यात आलेलं आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ कोर्टात जाण्याची तयारी पोलिसांनी केली आहे, अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

ज्यांनी अल्पवयीन मुलांना मद्य दिले त्यांच्यावर कारवाई झाली आहे. मुलाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. पुढची कारवाई लकरच पोलीस करणार आहेत. २ लोकांचा मृत्यू होऊन त्यांना सहजपणे सोडलं जाणार नाही. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल हे काम केलं पाहिजे. पोलीस देखील या संदर्भात कडक कारवाई करतीलआत्तापर्यंत काय घडलं आणि पुढची कारवाई काय करणार या संदर्भात बैठक घेतल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT