sonali tanpure 
पुणे

Pune Accident: ...म्हणून मी माझ्या मुलाची शाळा बदलली; आरोपी तरुणाबाबत प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

Prajakt Tanpure wife sonali tanpure: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरचा अल्पवयीन मुलगा दोन जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरचा अल्पवयीन मुलगा दोन जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी आरोपी अल्पवयीन मुलाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्या मुलामुळेच मला माझ्या मुलाला शाळेतून काढावं लागलं असं त्या म्हणाल्या आहेत.

सोनाली तनपुरे यांनी एक्सवर ट्वीट करत म्हटलंय की, कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या.संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.

मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असं त्या म्हणाल्या आहेत.

त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी सोनाली तनपुरे यांनी केली आहे.

आरोपी तरुणाने मद्यपान करुन पोर्शे कार चालवली होती. कार नियंत्रणाबाहेर गेल्याने त्याने टू-व्हीलरला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला होता. आरोपीने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमावाने पकडून त्याला मारहाण केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पण, १२ तासांत त्याची जामीनावर सुटका झाली आहे. या घटनेवरुन पुण्यासह राज्यातील लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

मिळाल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा १७ वर्षाचा आहे. त्यामुळे साहजिक त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. तरी त्याला पोर्शे अलिशान कार चालवण्याची परवानगी त्याच्या बिल्डर वडिलांनी दिली. तसेच तो मद्यपान करत असल्याची माहिती वडिलांना होती. पोर्शे कारची नोंदणी झालेली नव्हती, तसेच त्याला नंबर प्लेट सुद्धा नव्हती. पोलिसांनी आरोपीला पकडल्यानंतर त्याला विशेष वागणूक दिल्याचा देखील आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

FIFA World Cup 2026 full Schedule: ४८ संघ, ३९ दिवस अन् १०४ सामन्यांचा थरार रंगणार..! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या सर्वकाही

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

SCROLL FOR NEXT