Pune Road Potholes Sakal
पुणे

Pune Potholes : शहरात हजारो खड्डे; नोटीस फक्त एका कनिष्ठ अभियंत्याला

पुणे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने न बुजविल्यास ९ ऑगस्टनंतर याची जबाबदानिश्‍चित करून कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने न बुजविल्यास ९ ऑगस्टनंतर याची जबाबदारी निश्‍चित करून कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. ही मुदत उलटून गेली असली तरीही खड्डे बुजविण्याचे काम अपूर्ण आहे. याप्रकरणी केवळ एका कनिष्ठ अभियंत्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती येणे आवश्‍यक होते. पण त्यातच येरवडा येथील हॉटमिक्स प्लांट बंद पडल्याने चार दिवस खड्डे बुजविण्याचे काम ठप्प झालेले होते.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शहरातील प्रमुख १५ रस्त्यावरील खड्डे ९ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे आदेश दिले होते. जर या कालावधीत खड्डे बुजविले नाही तर संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिली होता.

ही मुदत उलटून गेल्यानंतरही प्रमुख १५ रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेतच सोबतच पसरलेली खडी, खचलेले चेंबर यामुळे धोकादायक रस्ते आहेत. पण त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावून पुढील कारवाई होणे अपेक्षीत आहे.

सातारा रस्त्यावर खड्डा पडल्याने नोटीस

महापालिकेने निवड केलेल्या प्रमुख १५ रस्त्यांमध्ये सातारा रस्त्याचा समावेश आहे. त्यावर पद्मावती येथे खड्डा पडल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित कनिष्ठ अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

‘सातारा रस्त्यावर पद्मावती येथे पडलेल्या खड्डा बुजविला नसल्याने कनिष्ठ अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर खुलासा आल्यानंतर पगारवाढ रोखणे, बढती रोखणे यासह इतर पद्धतीने कार्यवाही केली जाईल. शहरातील इतर रस्त्यावरही खड्डे पडले आहेत, याप्रकरणी नोटीस बजावली जाईल.’

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पथ विभागाकडे १२७ कनिष्ठ अभियंता

पथ विभागाचे सात कार्यकारी अभियंता असून, त्यांच्या अंतर्गत १२७ कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. १२ मीटर पेक्षा जास्त रुंदीचे सुमारे ४०० किलोमीटरचे रस्ते कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT