पुणे, ता. १२ : शहरातील मोक्याच्या ठिकाणी दर्जेदार निवासी व व्यापारी संकुलांची निर्मिती करण्यात नावलौकिक असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या भव्य प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे उद्घाटन घटस्थापनेच्या दिवशी करण्यात आले. या महोत्सवाचे हे १४ वे वर्ष आहे. शहराच्या विविध भागांमध्ये साकारत असलेल्या प्रकल्पांसाठी या महोत्सवात घरखरेदीदारांना सदनिकेच्या किमतीवर ९, १८ व २७ टक्के सवलत मिळवण्याची संधी आहे.
महोत्सवात पहिले बुकिंग केलेले ग्राहक गोपीनाथ बापट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, पूनम, अर्चित व अन्वी गोखले व मनाली बापट उपस्थित होते. महोत्सवाबाबत विशाल गोखले म्हणाले, “यंदा ११ ते २० ऑक्टोबर या नवरात्राच्या काळात घरखरेदीदारांना मयूर कॉलनी, कर्वे नगर, सहकार नगर, प्रभात रोड, करिष्मा चौक - कोथरूड, डीपी रोड कोथरूड, सीटी प्राईडजवळ कोथरूड या ठिकाणी साकारात असलेल्या भव्य व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या निवासी प्रकल्पांच्या माध्यमातून २ बीएचके ते ६.५ बीएचकेच्या स्काय व्हिलापर्यंतचे पर्याय घरखरेदीदारांसाठी उपलब्ध असतील व या सदनिकांच्या किमती अंदाजे रुपये १.६ कोटी पासून पुढे असतील.”
नजीकच्या भविष्यात गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे बाणेर, बावधन, औंध, हिंजवडी व बोट क्लब रोड येथे प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. हा फेस्टिव्हल गोखले हाउस, आयकर कार्यालयाजवळ, प्रभात रस्ता, या ठिकाणी सुरू आहे. महोत्सवाचा भाग असलेले प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहेत.
-----
फोटो ः 57284
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.