Pune Railway Police Bharti 2024 
पुणे

Railway Police Bharti: पुणे लोहमार्ग पोलिस भरतीची रविवारी होणार लेखी परिक्षा; उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या

Pune Railway Police Bharti 2024 : पुणे लोहमार्ग पोलिस विभागाच्या पोलिस भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची माहिती पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे लोहमार्ग पोलिस विभागाने घेतलेल्या पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गतची लेखी परिक्षा रविवारी (ता. ७) रोजी होणार आहे. या परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिलेल्या वेळेत परिक्षेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे लोहमार्ग पोलिस विभागाचे पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी केले आहे.

पुणे लोहमार्ग पोलिस विभागाच्या पोलिस भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची माहिती पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे लोहमार्ग पोलिस विभागातर्फे पोलिस शिपाई या पदावरील ५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी तीन हजारांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी 1600 जण मैदानी चाचणीमध्ये पात्र झाले होते. या उमेदवारांपैकी मैदानी चाचणी, गुणवत्ता यादी, जात प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार एकास दहा याप्रमाणे ३८३ जणांची लेखी परिक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.

संबंधित उमेदवारांच्या नावांची यादी punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, मैदानी चाचणी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा रविवारी ७ जुलै २०२४ या दिवशी होणार आहे. ही परिक्षा लष्कर परिसरातील ए.के.न्यू लॉ ॲकॅडमी ॲण्ड पीएचडी (लॉ) रिसर्च सेंटर, २३९०, के. बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, पुणे - ४११००१ या ठिकाणी होणार आहे.

उमेदवारांनी सकाळी 7 वाजता परिक्षेच्या ठिकाणी हजर रहायचे आहे. सकाळी ९.३० वाजल्यानंतर कोणालाही परिक्षेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. त्यादृष्टीने उमेदवारांनी काळजी घेऊन वेळेत उपस्थित राहावे. परिक्षेसाठी आवश्‍यक साहित्य लोहमार्ग पोलिसांकडून दिले जाणार आहे, त्यामुळे पेन, पेन्सील व अन्य कोणतेही साहित्य उमेदवारांनी आणू नये, असे आवाहनही दोषी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT