Flood-Pune 
पुणे

Pune Rains : होते सात, म्हणून वाचले १५०

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - रात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. ही पाणी पातळी वाढल्याने सहकारनगर भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. पावसाच्या जोरामुळे काही लोक आपल्या घरांमध्ये अडकले होते. हे लक्षात घेऊन आम्ही सात जणांनी स्वतःची बचावकार्य टीम तयार केली आणि स्थानिक रहिवाशांपैकी काहींना घेतले. या टीमने तातडीने या परिसरातील अरणेश्वर, टांगेवाली कॉलनीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या वसाहतीतील १२५ ते १५० लोकांना वाचविण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे परिसरात ‘होते ७ म्हणून वाचले १५०’ अशी चर्चा आहे.

या टीममध्ये असणाऱ्या वसीम शेख याने ही घटना सांगितली. तो म्हणाला, रात्री दहाच्या सुमारास आम्हाला समजले की, अरणेश्वर, टांगेवाली कॉलनी आणि गंगा तीर्थ कॉलनीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या वसाहतीत अनेक लोक अडकून पडले आहेत. त्यानंतर आम्ही त्यांना रेस्क्‍यू करून बाहेर काढायचे ठरवले. पण पावसाचा वेळ सरत नव्हता, पाऊस सतत कोसळत असल्यामुळे आम्ही हाताला येईल त्याचा आधार घेत ढोलची दोरी, शिडी आणि तिथे असणाऱ्या साड्यांचा आधार घेतला व त्या वसाहतीतील लोकांना वाचविले. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थानिक नागरिकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत केल्यामुळे एकमेकांचा आधार घेऊन आम्ही दीडशे जणांना वाचवण्यात यशस्वी झालो. या रेस्क्‍यू टीममध्ये वसीम शेख, गौरव मोरे, सुलतान मुजावर, अभिलाष मोरे, चंदन कुंबरे, विकी खेतकर हे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT