पुणे, ता. १८ : आई-वडिल आणि भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधिक कायद्याचे (पोस्को) विशेष न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा आदेश दिला.
रामेश्वर हरिश्चंद्र हंगरगे (वय २०) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर २०२१ ते १८ मार्च २०२२ या कालावधीत या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांना न्यायालय पैरवी अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पुणेकर आणि हवालदार डी. एम. गबदुले यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. आरोपीने कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तो वारंवार हे कृत्य करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून घडलेल्या घटनेबाबत मुलीने आई-वडिलांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून मुलीला देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.