Pune Ring Road Project 
पुणे

Pune Ring Road : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! रिंगरोडच्या भूमिपूजनाचा नारळ लवकरच फुटणार

Pune Ring Road Project : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) जवळपास साडे दहा हजार कोटी रूपये खर्च करून पुणे रिंग रोड उभारत आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुणे शहरासह आजूबाजूच्या तालुक्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पुणे रिंग रोडचे काम आता फास्ट ट्रॅकवर होणार आहे. १३६ किलोमीटर लांबीच्या या महत्वकांक्षी रस्त्यासाठी एमएसआरडीसीला तब्बल १६५३ हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. त्यापैकी ११९० हेक्टर म्हणजे जवळपास ७२ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाच्या भूमिपूजनाचा नारळ लवकरच फुटणार असल्याचे निश्चित झाले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) जवळपास साडे दहा हजार कोटी रूपये खर्च करून पुणे रिंग रोड उभारत आहे. मात्र पुणे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जागांचे भाव गगणाला भिडलेले असल्याने रिंगरोडसाठी आवश्यक असलेली १६५३ हेक्टर म्हणजे ४ हजार एकरहून अधिक जमीन मिळणार का असा प्रश्न एमएसआरडीसीसमोर होता. त्यातच खासगी जमीनीबरोबरच वन जमीन कशी मिळवायची असा प्रश्न होता. मात्र एमएसआरडीसीला जमीन संपादनात मोठे यश मिळाले असून आतापर्यंत ९८४ हेक्टर खासगी, ६९ हेक्टर शासकीय तर १३७ हेक्टर वन जमीन अशा एकूण ११९० हेक्टर जमीनीचे संपादन केले असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. तसेच उर्वरित जमीन संपादन पुढील काळात होईल असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्पासाठी अवाश्यक जमीन संपादित जमीन

खासगी १४४७ हेक्टर ९८४ हेक्टर

शासकीय ६९ हेक्टर ६९ हेक्टर

वन विभाग १३७ हेक्टर १३७ हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT