Pune Sinhagad Fort sakal
पुणे

Pune Sinhagad Fort : सिंहगडावरील ऐतिहासिक तिसऱ्या दरवाजांची साफसफाई

सिंहगडावरील ऐतिहासिक तिसरा पुणे दरवाजावर झुडपे उगविली होती. त्याची साफसफाई राज्य पुरातत्व विभागाच्या कामगारांनी साफसफाई केली आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : सिंहगडावरील ऐतिहासिक तिसरा पुणे दरवाजावर झुडपे उगविली होती. त्याची साफसफाई राज्य पुरातत्व विभागाच्या कामगारांनी साफसफाई केली आहे. दरवाजाच्या संवर्धनात मोठा हातभार लावला.

पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली. राज्य पुरातत्व विभागाचे नियंत्रणाखालील पिंपळे गुरव येथील शंकर जगताप यांच्या चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सिंहगडावरील सुभेदार तानाजी मालुसरेंच्या समाधी स्थळाचे देखभालीचे दायित्व स्वीकारले आहे. या दरवाज्याच्या भिंतीवर अनेक लहान मोठी झुडपे उगवली होती. पावसाळ्यापूर्वी ती काढण्यात आली.

यासाठी दरवाजाच्या बुरुजावरून खाली दोर सोडून त्यावरून खाली उतरून सफाई करावी लागली. खूपच अवघड ठिकाणी जाऊन ही मोहीम या कामगारांनी केली. स्वप्नील सांबरे हा कामगार खाली उतरला होता. स्वप्निल सांबरे सुमित रांजणे राहुल जोरकर आणि दत्ता बंडू जोरकर यांनी त्याला मदत केली.

उर्वरित दरवाजांची ही साफसफाई करण्याची गरज आहे. त्यासाठी, बुरुजावरून खाली उतरण्यासाठी रोप व अन्य साहित्याची गरज आहे. या उपक्रमाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्याने राज्य पुरातत्व विभाग, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व या कामगारांच्या धाडसाचे कौतुक समस्त शिवभक्तांनी केले. त्यांच्या माध्यमातून समाधी स्मारक, आणि सिंहगड परिसरात स्वच्छता करतात.

तसेच, गडावर देखभालीचे दायित्व घेतल्याने पुरातत्व विभागाच्या नियमित पहारा येथे सुरु असतो. तसेच गडावर दुर्घटना घडल्यावर येथील कामगार सर्वात अगोदर मदतीला धावतात. हत्ती तलावात बुडालेले विद्यार्थी पर्यटक, मधमाशांच्या हल्ला झाल्यावर वाट चुकलेल्या पर्यटकांच्या मदतीला धाऊण जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup नंतर टीम इंडिया WTC ट्रॉफी जिंकणार का? जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सद्यस्थिती काय?

LPG Cylinder: महत्वाची बातमी! मुंबईत एलपीजी गॅसचा तुटवडा; हॉटेल-रेस्टॉरंट्स अडचणीत, गॅस रिफिलसाठी वाढली प्रतीक्षा

भारताने ज्या क्षणी T20 World Cup जिंकला, त्या क्षणी कशी होती धोनी-रोहितची रिअॅक्शन? समोर आला खास Video

Pune Traffic: पुण्यातील वाहतुकीसंबंधी मोठा निर्णय! पावसाळ्यापूर्वी तीन पुलांचं काम होणार पूर्ण; 'या' रस्त्यांचंही झालं नियोजन

Migraine in Women: मासिक पाळीपासून कामाच्या ताणापर्यंत… महिलांमध्ये मायग्रेनचा धोका का वाढतोय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

SCROLL FOR NEXT