Dhananjay Damodar Dhumal sakal
पुणे

Pune News : पुणे सोलापुर महामार्गावर अपघात; एक ठार तर दोन जखमी

सकुंडे वस्ती येथे सेवा रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातांमध्ये एका तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भिगवण : पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी(ता.इंदापुर) गावच्या हद्दीत सकुंडे वस्ती येथे सेवा रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातांमध्ये एका तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी(ता.१४) रात्री बाराच्या सुमारास घडली.

धनंजय दामोदर धुमाळ(वय.२२ रा.कुंभारगाव,ता.इंदापुर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव आहे तर भारत पांडुरंग पोंद्कुले (वय २३) व किशोर दत्तात्रय घोडके(वय.२२ रा.दोघे,कुंभारगाव,ता.इंदापुर) हे अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कुंभारगांव (ता.इंदापुर) येथील तरुण डाळज (ता.इंदापुर) येथील यात्रेतून दुचाकीवरुन (क्र. एम. एच. ४२ बी.ए.३८२०) वरून तक्रारवाडी येथील यात्रेनिमित्त आयोजित मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जात असताना पुणे सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून हा अपघात घडला.

अपघातांमध्ये धनंजय धुमाळ यांचे डोक्याला व मणक्याला गंभीर इजा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार समीर करे करीत आहेत.

मागील दोन दिवसांमध्ये भिगवण व परिसरातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे या भागातील नागरिकांना धक्का बसला आहे. याबाबत योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांमधुन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT