covid vaccine sakal
पुणे

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या गावात कोरोना लसीकरणाची खास मोहीम

झेडपीच्या आरोग्य समितीचा निर्णय

- गजेंद्र बडे

पुणे : जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे आणि प्रमुख देवस्थान असलेल्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी खास महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने घेतला आहे. या निर्णयानुसार ही मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारने निश्‍चित केलेल्या मुदतीच्या आत या गावांतील नागरिक, पुजारी आणि तीर्थक्षेत्र व देवस्थानशी संबंधित सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गामुळे मागील सुमारे दीड वर्षापासून बंद असलेले तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील देवस्थाने व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्‍तांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग अद्यापही कमी झालेला दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले. या गावांमधील महाआरोग्य शिबिरांचे नियोजन करणे, त्यासाठीचे वेळापत्रक निश्‍चित करणे आणि या शिबिरासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याचा आदेश काकडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना दिला आहे.

जिल्ह्यात आळंदी, भीमाशंकर या प्रमुख देवस्थांनांसह राज्यातील आठपैकी पाच अष्टविनायक आहेत. या पाचमध्ये मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री यांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे शंभराहून अधिक क वर्गीय तीर्थक्षेत्र आहेत. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी आजच्या आरोग्य समितीच्या बैठकीत ही संकल्पना मांडली. त्यास कॉंग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, शिवसेनेचे गुलाब पारखे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे अभिजित तांबिले आदी सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

उर्वरित शिक्षकांचे लसीकरण

दरम्यान, मंदिर आणि तीर्थक्षेत्राप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळाही येत्या चार आक्टोबरपासून सुरु होत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक शिक्षकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण प्राधान्याने करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT